About Us

March 22, 2016
Smita Haldankar

मित्रानो,
सौ. स्मिता हळदणकर चा हृदय पूर्वक नमस्कार!!!!!
आपण इथ वर आलात आपले मना पासून आभार,
जगातील प्रथम मराठी घोषवाक्य वेबसाइट MarathiSlogans.com वर आपले हार्दिक स्वागत आहे. ह्या Website चा मुख्य उदेश वेगवेगळ्या सामाजिक विषयावरील प्रश्न, कारण व उपाय घोषवाक्य च्या मध्यातून लोकांपर्यंत पोचवायचा. ज्या द्वारे समाजात जागृती निर्माण करण्याचा हेतू आहे.

आपल्या नवीन मराठी पिढीच्या जीवनाला सामाजिक संस्कृती चे वळण देण्याचा एक छोटा प्रयत्न आहे…

माझ्या बद्दल थोडे काही आपल्याला जाणून घ्यायला नक्की आवडेल.
माझी मातृभाषा गुजराती आहे व सासर मराठी आहे. २७ वर्ष मराठी संस्कृती मध्ये वावरणं चालू आहे. मला मराठी साहित्याची आवड आहे कारण माझ्या पतीजींना वाचनाची प्रचंड आवड असल्यास घरात पुस्तकांचा भंडार आहे. मराठी बोलणे, वाचणे मला छान जमते…फक्त मराठी शुद्धलेखनात कधी कधी चुकते.

मी एक विज्ञान शिक्षिका होते २३ वर्ष सर्व्हिस करून स्वैच्छिक सेवा निवृत्ती घेतली. शाळेत असताना विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेऊन खूप प्रोजेक्ट्स बनवले होते…त्यात पॉप्युलेशन एज्युकेशन माझा आवडता विषय असायचा. खूप बक्षिसे हि मिळवली होती.

इमेजेस बनवणं हा माझा छंद आहे व ते जोपासण्यासाठी माझ्या शाळेच्या व्यवसायातून २३ वर्षांनी सेवानिवृत्ती घेतली आहे.
माझ्या इतर हि ३ वेबसाइट्स आहेत.
इतर वेबसाइट्स व घरातले काम मधून फावल्या वेळात ह्या Websiteचे काम पाहत आहे. म्हणून रेग्युलर अपडेट करणं शक्य होत नाही.

इथे असलेले सर्व स्लोगन्स पैकी जवळ जवळ ८०% स्लोगन्स इतर भाषेतून मराठीत भाषांतर करून मी बनवले आहेत. फक्त उर्वरित स्लोगन्स मित्र व युसर्स नि सबमीट केले आहेत.

इथे असलेले इमेजेस मी स्वतः बनवले आहेत.

लोकांच्या आग्रहास्तव ब्रँड स्लोगन्स ची नवीन कॅटेगरी ऍड केली आहे.

🔊आवडलेले स्लोगन्स तुम्ही आपल्या मित्रांसोबत SHARE करू शकता. ( WhatsAPP, Facebook, Email ,Twitter व इतर सर्व )

स्लोगन्स चा उपयोग स्वतः साठी करू शकता पण इतर वेबसाइट किंवा अँप बनवून व्यवसाय करण्यास माझी हरकत असेल.

इमेजेस चा वापर करताना त्यावरील लोगो अबाधित राहिला पाहिजे.

❤ Website ला FB Likes देऊन आम्हाला प्रोत्साहन द्यायला विसरू नका.

जेवेढे जास्त लोक या Website शी जोडले जातील तेवढीच जास्त मेहनत घेण्यास आम्हाला उत्साह प्राप्त होईल.

आपल्या प्रतिक्रिया आम्हाला पाठवायला विसरू नका. आम्ही वाट पहात आहोत..

👇 प्रतिक्रिया पाठवण्यासाठी खालील मार्ग उपलब्ध आहेत..
Contact Us Here 👈

धन्यवाद व अनेक शुभेच्छा.
सौ. स्मिता हळदणकर

मला मिळालेले बक्षिस चे काही फोटोग्राफ्स