Marathi Bhasha Slogans (मराठी भाषा घोषवाक्य) in Marathi

मराठी ही इंडो-युरोपीय भाषाकुळातील एक भाषा आहे. भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मराठी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे.
जोपर्यंत गावागावामध्ये मराठी भाषा विविध बोलींमध्ये बोलली, लिहिली जाते, त्याद्वारे व्यवहार होतो तोपर्यंत तिला भीती नाही. आपल्या भाषेचा विकास करणे हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे.
मराठी भाषेच्या विकास आणि संवर्धनासाठी इथे ‘मराठी भाषा घोषवाक्य’ रूपाने प्रयत्न केला आहे. ह्या घोषवाक्याना सर्व लोकां पर्यंत पोह्चवूया व मराठी भाषेला चिरायू करण्यास आपला हाथभार लावूया.